खो-खो खेळाच्या विकास आणि प्रसारासाठी सर्वोतोपरी मदत करणार- श्री. समीर मुळे


22 May 2021

औरंगाबाद, नुकतीच चौथी खेलो इंडिया युथ गेम्स राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो संघाने सुवर्णपदक प्राप्त केले, महाराष्ट्राच्या संघात औरंगाबादची कु. मयुरी वसंत पवार हिने लौकिकास्पद खेळ करून राज्याला 'सुवर्णपदक' मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. औरंगाबाद जिल्ह्याची सुवर्णकन्या कु. मयुरी वसंत पवार हिने वेळोवेळी मिळविलेल्या यशानिमित्त दि. औरंगाबाद खो-खो असोसिएशनच्या वतीने तिचा आज भव्य सत्कार संघटनेचे अध्यक्ष श्री. समीरभैया मुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.